Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर कोरोनाबाधित

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री  व भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. जावडेकर यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. मी करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया स्वतःची तपासणी करून घ्यावी. असं जावडेकर यांनी म्हटले  आहे.

Advertisements

 

दरम्यान, ”ऑक्सिजन मिळण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे मनुष्यबळ टेस्टिंग, ट्रॅकींग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी लागणार आहे. ते मनुष्यबळ घेण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशनमधून केंद्र सरकार पैसे देणार आहे. कारण, आम्ही असे  मानतो हे राष्ट्रीय संकट आहे. सगळी राज्य सगळी जनता आमचीच आहे. त्यामुळे जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे जास्त लक्ष आणि उपाय अशा स्वरूपाचं धोरण आहे.” अशी माहिती जावडेकर यांनी १० एप्रिल रोजी पुण्यातील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली होती.

Advertisements
Advertisements

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!