MaharashtraLockDownUpdate : गरज असेल तरच घराबाहेर पडा , अशी आहे राज्य सरकारची नियमावली

मुंबई : राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून राज्यात लॉकडाऊनची अंमलबाजवणी सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस घरीच राहावे, आवश्यक वाटल्यास घरातून बाहेर पडावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
राज्यात आज 14 एप्रिल 2021 रात्री 8 वाजल्यापासून 1 मे 2021 पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अनेक निर्बंध राज्य सरकारने जाहीर केले आहे. पुढील 15 दिवस कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच रिक्षाचालक, बांधकाम कामगार, फेरीवाले यांनी आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी 5 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
अशी आहे राज्य सरकारची नियमावली
1) कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी
- A) 14 एप्रिल, 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात संचारबंदी लागू
- B) खाली नमूद केलेल्या वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी कोणीही नाही.
- C) सर्व काही आस्थापने, सार्वजनिक स्थाने, उपक्रम, सेवा बंद राहतील.
- D) जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत.
- E) अपवादश्रेणीत असलेल्या सेवा आणि व्यवहार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कार्यालयीन दिवसांसाठी वगळण्यात आल्या आहेत.
- F) मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.
2) जीवनावश्यक श्रेणीमध्ये खालील गोष्टींचा समावेश
1) रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मेसियां, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे व्यापारी, वाहतूक व पुरवठा साखळीतील व्यक्ती. लस, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांची उपकरणे, कच्चा माल युनिट्स आणि त्याचे उत्पादन व वितरण.
2) पशुवैद्यकीय सेवा / पशुसेवा शेकर आणि पाळीव खाद्यपदार्थाची दुकाने
3) किराणा सामान, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, सर्व खाद्य दुकाने प्रकार.
4) कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा
5) (Transport) सार्वजनिक वाहतूक: विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस.
6) विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा.
7) स्थानिक प्राधिकरणांनी मान्सूनपूर्व उपक्रम, देखभाल, दुरुस्तीची कामे
8) स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक कामे.
9) भारतीय रिझर्व बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या सेवा आवश्यक आहेत
10) सेबीच्या सर्व कार्यालये, बाजारातील मूलभूत सुविधा संस्था जसे की स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिरी, क्लिअरिंग संबंधित कामे
11) दूरसंचार सेवांच्या संबंधित सेवा / देखभालीसाठी आवश्यक सेवा
12) माल वाहतूक
13) पाणीपुरवठा सेवा
14) शेती संबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यांसह कृषी क्षेत्राचे अखंड निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित कामे आणि त्याशी संबंधित उपक्रम
15) निर्यात – सर्व वस्तूंची आयात
16) ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी)
17) अधिकृत मीडिया
18) पेट्रोल पंप आणि पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, ऑफशोर / किनारपट्टीचा समावेश आहे
19) सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
20) डेटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिसेस आयटी सेवा जे गंभीर पायाभूत सुविधांना आधार देतात अशा सेवा
21) सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा
22) विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा
23) एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा
24) टपाल सेवा
25) बंदरे आणि संबंधित सेवा
26) लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आणि औषधी उत्पादकांचे कस्टम हाऊस एजंट तसेच परवानाधारक मल्टिमोडल वाहतूकदार
27) कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल पॅकेजिंग साहित्य तयार करणारे कारखाने
28) आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक किंवा संस्थात्मक उत्पादनांमध्ये कार्यरत कारखाने
29) स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा
महत्वाच्या सूचना
1). सर्व अधिकारी कार्यालयांनी हे सर्व निर्बंध नागरिकांच्या वावरावर असून वस्तू आणि मालावर हीत, हे लक्षात घ्यावे.
2) यामध्ये उल्लेखलेल्या सेवांच्या कार्यान्वयासाठी आवश्यक वाहतूक हे वैध कारण राहील, हे लक्षात घ्यावे.
3) या सेवांची विशिष्ट वेळी वा कारणाने गरज भासली तर संबंधित व्यक्ती वा संस्थेसाठी ती सेवा जीवानावश्यक गणली जावी. त्यासाठी मूळ तत्वे हे जीवनावश्यकतेसाठी आवश्यक ते आवश्यक हे असावे.
अत्यावश्यक सेवांच्या अंतर्गत येणारी दुकाने आणि मार्गदर्शक सूचना
- A) जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाने कार्यरत राहताना कोविड सुसंगत वागणूक ठेवणे आवश्यक आहे म्हणजे दुकान मालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनीही दुकानाच्या परिसरात तसे वागायला हवे.
- B) जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान मालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी लवकरात वलकर लशीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकाशी पारदर्शक काचेच्या मधून किंवा इतर संरक्षक पदार्थ्यांच्या द्वारे संपर्क करणे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे वळते करणे अशी सुरक्षाविषयक काळजी घ्यावी.
- C) या नियमांचा भंग करणाऱ्या दुकान मालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला 500 रुपये दंड आकारला जाईल. तसेच कोविड सुसंगत वागणुकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला 1000 रुपये दंड केला जाईल. तसेच कोविड विषयक संकटाची अधिसूचना संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कारवाईही केली जाऊ शकेल.
- D) 1बीच्या कार्यवाहीसाठी जीवानावश्यक वस्तू दुकानातले व्यवहार करण्यासाठी कर्तव्यपूर्तीसाठी कामगारांची वाहतूक हे वैध कारण धरले जाईल.
- E) 2 (3) मध्ये नमूद केलेल्या वाण्याचे दुकान, भाजीपाला दुकान, फळविक्रेते, दूध दुकाने, बेकरी, खाद्यपदार्थ दुकाने सर्वाच्या संदर्भात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी दुकाने आहेत का किंवा दुकानांमध्ये गर्दी होते का याबद्दल स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अभ्यास करुन दुकानांच्या वेळा बदलणे तसेच दुकानांच्या वेळा निर्धारित करुन देणे आवश्यक आहे.
- F) सध्या बंद असलेल्या सर्व दुकानांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांचे लसीकरण करुन घ्यावे तसेच ग्राहकांशी संपर्क काचेच्या संरक्षक कवचाच्या माध्यमातून यावा ही पूर्वकाळजी घेण्याची सुविधा निर्माण करावी.
4) सार्वजनिक वाहतूक खालील निर्बंधांसह सुरू राहील
ऑटो रिक्षा – चालक अधिक 2 प्रवासी
टॅक्सी (चारचाकी) – चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता
बस – पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी
अ) सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्यांसाठी मास्क वापरणे बंधनकारक, मास्क नसल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल.
ब) चारचाकी टॅक्सीमध्ये जर मास्क घातला नसेल तर तो प्रवासी आणि चालकालाही 500 रुपये दंड
क) प्रत्येक खेपेनंतर वाहने सॅनिटाईज करणे आवश्यक आहे.
ड) भारत सरकारच्या नियमानुसार सर्व प्रवासी वाहनांचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लशीकरण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कोविड सुसुंगत वागणुकीचे दर्शन घडवणेही गरजेचे आहे. टॅक्सी आणि ऑटोरिक्षांसाठी चालकाने स्वत:च्या आणि प्रवाशांमध्ये प्लास्टिक आवरण घालून संरक्षण कवच निर्माण करावे.
ई) 1(बी) नुसार सार्वजनिक वाहतुकीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास हे वैध कारण असेल.
एफ) बाहेरगावच्या ट्रेन्ससाठी रेल्वे प्रशासनाने उभे राहून कोणीही प्रवासी प्रवास करणार नाहीत याची खातरजमा करावी. तसेच सर्व प्रवासी मास्क घालतात की नाही हे पहावे.
जी) कोविड सुसंगत वागणूक न केल्यास 500 रुपये दंड सर्व ट्रेन्समध्येही लावावा.
एच) सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देतानाती सुरळीतपणे व्हावी यासाठी लागणाऱ्या नैमित्तिक सेवाही त्यात समाविष्ट करुनच ही परवानगी देण्यात आलीय. त्यात हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या कार्गोसारख्या सेवा तसेच तिकीट विषयक सेवांचाही समावेश आहे.
आय) सार्वजनिक वाहतुकने म्हणजेच कोणतीही बस / ट्रेन / विमानाने आलेल्या प्रवाशांना येताना किंवा जाताना घरी जाण्यासाठी वा घरून येण्यासाठी करावा लागणारा प्रवास वैध प्रवास तिकीट दाखवून करता येईल.
कलम 1 मधील सर्वसामान्य तरतुदींना बाधा न आणता असे घोषित करण्यात येते की
चित्रपटगृहे बंद राहणार
नाट्यगृहे व प्रेक्षागृह बंद राहणार
मनोरंजन उद्याने / खरेदी केंद्रे / व्हिडीओ गेम पार्लर्स बंद राहणार
जल क्रीडा केंद्रे बंद राहणार
क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुले बंद राहणार
सदर अस्थापनांशी संबंधित सर्व व्यक्ती भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घेतील जेणेकरुन कोविड 19 विषाणूच्या प्रसाराचे भय न राहता सदर आस्थापना लवकर सुरू करता येतील.
चित्रपट / मालिका / जाहिरातीचे चित्रीकरण बंद राहील
अत्यावश्यक सेवा न पुरवणारी सर्व दुकाने, खरेदी केंद्र बंद राहणार
समुद्र किनारे, बगीचे, खुल्या जागा अशी सार्वजनिक वावराची ठिकाणे बंद राहणार. सदर सार्वजनिक जागा जर नमूद प्रयोजनार्थ वापरण्यात येत असतील तर सदर आदेशाच्या कार्यवाहीच्या कालावधीत त्यांचा वापर करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने योग्य तो निर्णय घ्यावा.
धार्मिक पूजास्थाने व स्थळे
धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहणार
प्रार्थनास्थळात सेवेत असणारे कर्मचारी हे त्यांची तेथील विहित दैनंदिन कर्तव्ये करू शकतील. पण बाहेरील अभ्यागतांना प्रवेश बंद राहील.
नाभिक दुकाने / सौंदर्य प्रसाधन केंद्र / केश कर्तनालय
नाभिक दुकाने / सौंदर्य प्रसाधने / केश कर्तनालये बंद राहणार
शाळा व महाविद्यालये बंद राहणार
इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांशी संंबंधित बाबीपुरती सदर नियमात सूट देण्यात येत आहे. संबंधित परीक्षांच्या परीचलनाशी संबंधित सर्व कर्मचारी यांचे लसीकरण करणे आवश्यक असेल अथवा त्यांनी 48 तासांसाठी वैध असणारे आरटीपीसीआर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक असेल.