Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : २४ तासात  २ लाख ७३९ नवीन रुग्णांची नोंद तर १ हजार ०३८ रुग्णांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : देशभरात कोरोना संक्रमणाचा वेग पुन्हा एकदा वाढला असून कोरोनाबाधितांचे  आकडे दररोज एक नवा उच्चांक गाठत नवनवीन रेकॉर्ड कायम करताना दिसत आहे. बुधवारी भारतात पहिल्यांदाच दोन लाखांहून रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान रुग्णांचाही समावेश आहे. दरम्यान बुधवारी २४ तासात  २ लाख ७३९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे . विशेष म्हणजे  हा देशातील एका दिवसाचा सर्वात मोठा आकडा आहे.  तर  १ हजार ०३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Advertisements

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७३ हजार १२३ नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १४ लाख ७१ हजार ८७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisements
Advertisements

आयसीएमआर (ICMR)ने  दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी देशात १३ लाख ८४ हजार ५४९ नमुन्यांची करोना तपासणी करण्यात आली. तर देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी २० लाख ०३ हजार ४१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४
उपचार सुरू : १४ लाख ७१ हजार ८७७
एकूण मृत्यू : १ लाख ७३ हजार १२३
करोना लसीचे डोस दिले गेले : ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८

आपलं सरकार

Click to listen highlighted text!