AurangabadCrimeUpdate : ब्रेक द चैन : ट्रॅक्टरमधे कडब्याखाली तर, ट्रॅव्हल्स कार मधून दारुची विक्री !!

औरंगाबाद – शासनाच्या आदेशाचा अर्थ कोण कसा काढेल हे सांगता येणं कठीण आहे.टूर्स अॅंड ट्रॅव्हल्स चा व्यावसायिक कारमधे देशी विदेशी दारुचे बाॅक्स घेत घरपोच चढ्या दरात विक्री करतांना पुंडलिकनगर पोलिसांनी पकडला तर मुकुंदनगरातील सुमन पिराजी गायकवाड या चोरट्या दारुचा व्यापार करणार्या महिलेने लाॅकडाऊनमधे चढ्या दराने दारुविक्री करण्यासाठी ट्रॅक्टर मधे कडब्याखाली लपवून आणलेली दारु गुन्हेशाखेने पकडली.या प्रकरणी पुंडलिकनगर आणि एम सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
पुंडलिकनगर पोलिसांनी काल रात्री ११च्या सुमारास नवनाथ श्रीमंत बोडखे(३२) याला कार मधून दारु वाहतूक करतांना अटक केली. तर गुन्हे शाखेने झाल्टा फाटा परिसरातही काल गुन्हेशाखेने गणपत धोंडीराम नजन(४०) सुमन पिराजी गायकवाड आणि जगन्नाथ एकनाथ जोशी या तिघांना अटक केली. दोन्ही आरोपींकडून दारु सहित ७लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील कारवाईत गुन्हेशाखेचे एपीआय मनोज शिंदे, पोलिस कर्मचारी संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी,रितेश जाधव, विशाल पाटील , आनंद वाहूळ यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली तर एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मीरा चव्हाण, पोलिस हेडकाॅन्स्टेबल रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवि जाधव निखील खराडकर यांनी पार पाडली.