GujratNewsUpdate : धक्कादायक : दर मिनिटाला दोन जणांना कोरोनाची लागण, गुजरातमध्ये अखेर न्यायालयाच्या आदेशाने संचारबंदी

गांधीनगर : देशात महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची चर्चा होत असली तरी शेजारच्या गुजरात राज्यात रोज कोरोनाचा उद्रेक होत असतानाही सरकारकडून कडक निर्बंध लावले जात नसल्याने गुजरात राज्यातील वाढत्या कोरोनाा रुग्णांची संख्या लक्षात घेऊन गुजरात उच्च न्यायालयाने राज्यात 3-4 दिवस संचारबंदी लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
दरम्यान गुजरातमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील सरकारी, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी असे न्यायालयाने म्हंटले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने राज्यातील 20 शहरे आणि 8 महानगरांमध्ये रात्री 8 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार 7 एप्रिलपासून या निर्णयाची अंंमलबजावणी होईल. या सर्व शहरांमध्ये कोरना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ही घोषणा केली आहे.
याशिवाय राज्यात लग्न समारंभांना फक्त 100 नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व मोठे कार्यक्रम 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. गुजरातमधील सर्व सरकारी कार्यालये 30 एप्रिलपर्यंत दर शनिवारी बंद असतील. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आठ शहरांमध्ये नवे कोव्हिड सेंटर सुरु करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. प्रत्येक कोव्हिड सेंटरमध्ये 500 बेडची क्षमता आहे. गुजरात राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचे प्रमाण पाहिले तर दर मिनिटाला दोन जणांना कोरनाची लागण होत आहे. देशात सोमवारी 1,03,558 जणांना कोरनाची लागण झाली. हा एका दिवसात आढळलेली कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे.