Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात वीजेचे दर कमी करण्याठी प्रयत्न : ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्स्चेंजमधून दररोज साधारणतः ११०० ते १८०० मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्स्चेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे, निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत  यांनी दिले आहेत . दरम्यान थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्या खपवून घेतल्या जाणार नाही, असे  सांगत नितीन राऊत यांनी महावितरण व प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे  सांगितले .

Advertisements

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसंच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे  आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले  आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला प्राधान्य देण्याचे आदेशही यावेळी त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिले आहेत. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली.

Advertisements
Advertisements

ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीदेखील जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करा. कोरोना काळात रीडिंग न घेता बिले  पाठवण्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. म्हणून शक्यतो मीटर रीडिंग घेऊनच वीज बिले  पाठवावीत. करोनामुळे काही वेळा महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रीडिंग पाठवले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल,” असे  मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!