CoronaMaharashtraUpdate : कोरोनाचा मोठा उद्रेक , राज्यात 40 हजार 414 नवे रुग्ण , 108 मृत्यू

मुंबई : राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला पहायला मिळाला आहे. राज्यात आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
आज नवीन 17 हजार 874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 23,32,453 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 325901 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% झाले आहे. आज दिवसभरात कोरोनाने 108 रुग्णांचा बळी घेतला आहे.
पुण्यात परिस्थिती गंभीर
कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच एका दिवसात दोन हजारांचा टप्पा ओलांडला. आज 2275 रुग्णांची नोंद. गेल्या वर्षी एका दिवसांत 1500 च्या वर रुग्ण आढळले नव्हते. दुसरी लाट शहरवासीयांचं चांगलंच कंबरडे मोडले. तर पुणे शहरात आज नव्याने 4 हजार 426 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 59 हजार 112 इतकी झाली आहे.