WorldNewsUpdate : पंतप्रधान भारतात परतल्यानंतरही बांग्लादेशातील कट्टरपंथीयांकडून हिंसक आंदोलन , १० ठार

भारताकडून मोदींची बांग्लादेशाला 12 लाख कोविड-19 लशीची भेट
ढाका : भारतात मुस्लिमांसोबत भेदभाव होत असल्याचा आरोप करीत बांग्लादेशातील कट्टरपंथीयांकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्याच्या वेळी आणि दौरा संपल्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवले असून या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला आहे . आंदोलकांनी रविवारी देशाच्या पूर्वेकडील भागातील एका ट्रेनवरही निशाणा साधला. स्थानिक पत्रकार आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याविरोधात बांग्लादेशातील अनेक भागात निषेध नोंदविला जात होता. अनेक भागात आंदोलनकर्ते हिंसक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान हिंसक जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 10 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी बांग्लादेशाच्या 50 व्या स्वातंत्र दिनानिमित्त राजधानी ढाका येथे भेट दिली. दोन दिवसांचा दौऱा पूर्ण केल्यानंतर शनिवारी ते भारतात परतले. त्यांनी यादरम्यान बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना 12 लाख कोविड-19 लशीचा डोज भेट म्हणून दिला. शुक्रवारी ढाकामध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी टीयर गॅर आणि रबराच्या गोळ्यांचा वापर केला. ज्यामुळे अनेक लोक जखमी झाले. हजारो इस्लामवादी कार्यकर्त्यांनी शनिवारी चटगांव आणि ढाकाच्या रस्त्यांवर रॅली काढली. रविवारी हिफाजत-ए-इस्लाम समुहाच्या कार्याकर्त्यांनी ब्राम्हणबरियामध्ये एका ट्रेनवर हल्ला केला. ज्यामुळे 10 लोक जखमी झाले.
सरकारी कार्यालयात लावली आग
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार ब्राम्हणबरियाचे पत्रकार जावेद रहीम यांच्या हवाल्याने सांगितले की, ब्राम्हणबरियात अग्नितांडव सुरू आहे. अनेक सरकारी कार्यालयात आग लावण्यात आली आहे.इतकच नाही तर प्रेस क्लबवरदेखील हल्ला झाला आणि यात अनेक लोक जखमी झाले. ज्यात प्रेस क्लबच्या अध्यक्षांचादेखील समावेश आहे. पोलिसांनी सांगितलं की शहरातील अनेक हिंदू मंदिरांवरही हल्ला करण्यात आला.दरम्यान या जमावाने राजशाही शहरातील दोन बसेसना आग लावली. तसेच पोलिसांवरही दगडफेक केली.