चिंताजनक लोकसभा २०१९ : रस्त्यावर जप्त करण्यात आलेली रोख रक्कम १५० कोटींच्या घरात : निवडणूक अयोग

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या देशभर लागलेल्या आचारसंहितेअंतर्गत गेल्या पंधरा दिवसांत देशभरात जी कारवाई झाली त्यात १४३.३७ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर दारू आणि नशेची औषधेही पकडण्यात आली असल्याचे वृत्त भारतीय लोकशाहीसाठी चिंताजनक बाब आहे .
देशभरात ७ टप्प्यात निवडणूक होत असून पुढील महिन्याच्या ११ एप्रिलपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात असून त्याच्या प्रचाराची रणधुमाळी लवकरच सुरु होत आहे . त्याच प्रचार मोहिमेचा भाग म्हणून मतदारांना प्रलोभने दाखविण्यासाठी अनेक धनाढ्य उमेदवारांकडून पैसे आणि दारूचा वापर २०१९ च्या या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होईल अशी चिन्हे आहेत . कारण साम , दाम , दंड भेद नीतीने हि निवडणूक जिंकण्याचा पण काही पक्षांनी आणि उमेदवारांनी केला आहे हे उघड आहे . अशा परिस्थितीत डोळ्यात तेल घालून आचारसंहितेची पथके रस्त्यावर पळत ठेवून आपली कारवाई करीत आहेत .
निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक निवणूक निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी प्रत्येक राज्यांमध्ये निरिक्षक नेमले आहेत. तसेच पोलिस, सीआरपीफ जवानांनाही तैनात केले आहे. सात टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. २३ मे रोजी या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार तामिळनाडूमध्ये जप्त केलेल्या रक्कमा आणि अन्य वस्तूंची किंमत १०७.२४ कोटी रुपये आहे. तर उत्तर प्रदेशात १०४.५३ कोटी रुपये, आंध्र प्रदेशमध्ये १०३.०४ कोटी रुपये आणि पंजाबमध्ये ९२.८ कोटी रुपयांची रोख रक्कम, दारू आणि नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कर्नाटकमधून २६.३३ कोटी, महाराष्ट्रात १९.११ कोटी आणि तेलंगानामध्ये ८.२ कोटी रुपयांची रक्कम, दारू आणि किंमती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.