Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चिंताजनक लोकसभा २०१९ : रस्त्यावर जप्त करण्यात आलेली रोख रक्कम १५० कोटींच्या घरात : निवडणूक अयोग

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या  देशभर लागलेल्या आचारसंहितेअंतर्गत  गेल्या पंधरा दिवसांत देशभरात जी कारवाई  झाली त्यात १४३.३७ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर दारू आणि नशेची औषधेही पकडण्यात आली असल्याचे वृत्त भारतीय लोकशाहीसाठी चिंताजनक बाब आहे .

Advertisements

देशभरात ७ टप्प्यात निवडणूक होत असून पुढील महिन्याच्या ११ एप्रिलपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात असून त्याच्या प्रचाराची रणधुमाळी लवकरच सुरु होत आहे . त्याच प्रचार मोहिमेचा भाग म्हणून मतदारांना प्रलोभने दाखविण्यासाठी अनेक धनाढ्य उमेदवारांकडून पैसे आणि दारूचा वापर २०१९ च्या या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होईल अशी चिन्हे आहेत . कारण साम , दाम , दंड भेद नीतीने हि निवडणूक जिंकण्याचा पण काही पक्षांनी आणि उमेदवारांनी केला आहे हे उघड आहे . अशा परिस्थितीत डोळ्यात तेल घालून आचारसंहितेची पथके रस्त्यावर पळत ठेवून आपली कारवाई करीत आहेत .

Advertisements
Advertisements

निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक निवणूक निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी  प्रत्येक राज्यांमध्ये निरिक्षक नेमले आहेत. तसेच पोलिस, सीआरपीफ जवानांनाही तैनात केले आहे. सात टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. २३ मे रोजी या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.  उपलब्ध माहितीनुसार  तामिळनाडूमध्ये जप्त केलेल्या रक्कमा आणि अन्य वस्तूंची किंमत १०७.२४ कोटी रुपये आहे. तर उत्तर प्रदेशात १०४.५३ कोटी रुपये, आंध्र प्रदेशमध्ये १०३.०४ कोटी रुपये आणि पंजाबमध्ये ९२.८ कोटी रुपयांची रोख रक्कम, दारू आणि नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कर्नाटकमधून २६.३३ कोटी, महाराष्ट्रात १९.११ कोटी आणि तेलंगानामध्ये ८.२ कोटी रुपयांची  रक्कम, दारू आणि किंमती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त केलेल्या वस्तूंचे मुल्य ५३९.९९ कोटी रुपये आहे. निवडणूक आयोगाने २५ मार्चला जारी केलेल्या आकडेवारीनुसार एकूण १४३.३७ कोटी रुपये रोख  , ८९.६४ कोटी रुपयांची दारू, १३१.७५ कोटी रुपयांची नशेचे पदार्थ, सोने आणि अन्य किंमती वस्तूंचा समावेश असल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच १६२.९३ कोटी रुपयांचे अन्य किंमती साहित्य आणि १२.२० कोटी रुपयांचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!