CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोनाचा महाप्रहार !! 30,535 नवे रुग्ण , ९९ मृत्यू

मुंबई | राज्यावर कोरोनाचे प्रहार चालूच असून कालच्या उच्चांकानंतर आज पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला असून रुग्णवाढीची धडकी भरवणारा आकडा समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ३० हजार ५३५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या २७ हजार १२६ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ ३ हजार ४०९ ने अधिक आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ११ हजार ३१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख १० हजार १२० वर जाऊन पोहचली आहे. राज्यातील एकूण मृत्युंचा आकडा ५३ हजार ३९९ वर पोहोचला आहे.
आज राज्यात एकूण ९९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ टक्के इतका आहे. राज्यात आज ११ हजार ३१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २२ लाख १४ हजार ८६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३२ टक्क्यांवर आला आहे. मुंबईमध्ये ३७७९ नवीन रुग्णांची तर १० मृत्यूची नोंद झाली. पुणे महापालिका क्षेत्रात २९७८ तर नागपूर महापालिका क्षेत्रात ३६१४ नव्या रुग्णांची तर ३२ मृत्यूची नोंद झाली.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख १० हजार १२० इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४२ हजार ०१५ इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो २९ हजार ७७१ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २२ हजार ०८१ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या १९ हजार ७८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ६१९ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ३ हजार ५३३, औरंगाबादमध्ये १३ हजार ६८६, जळगावमध्ये ६ हजार ५१८, अहमदनगरमध्ये ४ हजार २८९ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ५१० इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३१४ इतकी आहे.