AurangabadNewsUpdate : नक्षत्रवाडीत महिला पोलीस पतीची आत्महत्या

औरंगाबाद । पती-पत्नी मधे झालेल्या किरकोळ वादानंतर पतीने नक्षत्रवाडीमधील राहत्या घरी गळफास घेतला या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप रामकिसन गवळी वय- 40 असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस पतीचे नाव आहे.त्यांची पत्नी कविता गवळी यांची नियुक्ती सिल्लेगाव पोलिस ठाण्यात आहे.
दिलीप यांचे नात्यातच लग्न झालेले आहे.त्यांना दोन मुली असून दिलीप हे किराणा दुकानाचा व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री पती-पत्नी मध्ये घरघुती वाद झाला होता.त्या नंतर दिलीप यांनी राहत्याघरी गळफास घेत आत्महत्या केली.हा प्रकार समोर येताच पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी घटनस्थळी धाव घेत दिलीप यांना रुग्णालयात हलविले.मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी इथापे करंत करीत आहेत.