AurangabadCrimeUpdate : बॅंकेच्या जप्त केलेल्या मोटरसायकल म्हणून विक्री करणार्या टोळीचा पर्दापाश

औरंगाबाद – शहरासहित जालना,बुलढाणा, नाशिक, जळगाव येथून ८लाख ४७ हजारांच्या २३ मोटरसायकल चोरुन बॅंकेच्या जप्त केलेल्या मोटरसायकल म्हणून विक्री करणार्या टोळीला ग्रामीण गुन्हेशाखेने मुद्देमालासहित ६चोरट्यांना जेरबंद केले.व पुढील तपासासाठी करमाड पोलिसांच्या हवाली केले.
शेखर उर्फ आण्णा प्रकाश दांडगे रा रेणूकाई पिंपळगाव व विलास रामभाऊ कुर्हाडे रा.हिसोडा हे दोन भोकरदन तालुक्यातील चोरटे रैरेकाॅर्डवरचे आहेत. तर त्यांचे साथीदार श्रीराम जोनवाल,तेजराव जाधव,ज्ञानेश्वर पवार, गजानन गोठवाल है जालना आणि बुलढाणा परिसरातील आहेत. वरील टोळक्याने महाराष्र्टातील मोठमोठ्या शहरातून मोटरसायकल चोरल्या व त्या बॅंकेने जप्त केल्याचा बनाव करंत नागरिकांना विकल्या. पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक भागवत फुंदे यांनी कारवाई पार पाडली. या कारवाईत पीएसआय संदीप सोळंके, पोलिस कर्मचारी राहूल पगारे, संजय भोसले,बाबासाहब नवले, संजय तांदळे यांनी सहभाग घेतला होता