Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : कोरोनाच्या वेगाने भेदले पंतप्रधानाचे लक्ष्य , मुख्यमंत्र्यांशी बोलून मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Spread the love

नवी दिल्ली :  ममतांच्या बंगालवर लक्ष देणे महत्वाचे असले तरी आपण पंतप्रधान असल्याने देशात उग्र रूप धारण करीत असलेल्या कोरोनाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे याची जाणीव झाल्याने , वाढत्या कोरोनाच्या वेगाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य भेदल्याने यांनी या विषयावर  महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार उद्या १७ मार्चला बुधवारी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान मोदीं सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांच्याकडून मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जगाच्या यादीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत कोरोना संक्रमणात तिसऱ्या क्रमांकावरचा देश ठरला आहे.

विशेष करून महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, दिल्ली आणि यूपीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आधीच संबंधित राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे आणि ही वाढत वेगाने होत आहे. यामुळे आता सतर्कता नाही बाळगली तर देशात करोनाने आणखी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

दरम्यान गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करोनाने देशात कहर केला होता. देशात त्यावेळी करोनाचे दररोज १ लाखाच्या जवळपास रुग्ण आढळून येत होते. आता देशात पुन्हा याच वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत ३.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे २६,२९१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाने १३० हुन अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर परवा रविवारी करोनाचे २५,३२० रुग्ण आढळून आले होते.

IndiaCoronaUpdate 

India Coronavirus Cases: 11,409,524
Deaths: 158,892 Recovered: 11,025,493
CLOSED CASES :
11,184,385 : Cases which had an outcome:
11,025,493 (99%) Recovered / Discharged :
158,892 (1%) Deaths
Total Vaccination : 2,99,08,038 (1,40,880 )

*Last updated: March 15, 2021, 19:23 GMT | source : worldometers

आपलं सरकार

Click to listen highlighted text!