भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाचा खून, दोनमहिलेसहित चौघे अटकेत

औरंगाबाद – अंगूरीबाग परिसरात मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वा. दुकान बंद करुन घरी जाणार्या तरुणाचा भांडण सौडवतांना खून केल्या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी दोन महिलांसहित चौघांना अटक केली.
सय्यद दानिशौद्दीन सय्यद शफीओद्दीन (२२) रा. अंगूरीबाग असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तसेच जखमी मधे सलीम, बाबा आणि शेख जब्बार यांचा समावेश आहे.तर नितीन खंडागळे, सोमिनाथ खंडागळे या भावांच्या आई आणि बहीणीचा अटक आरोपींमधे समावेश आहे. जानेवारी २१ मधे नितीन खंडागळेचे जखमी बाबा आणि सलीम सोबंत किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. आज वरील जखमी मोटरसायकलवर घटनास्थळी आले तेंव्हा आरोपी नितीन खंडागळे ने तिघांवर चाकू हल्ला केला. त्याच वेळी मयत दानिशोद्दीन त्याचे किराणा दुकान बंद करुन घरी जात होता. त्याने वरील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता नितीन खंडागळे आणि त्याचा भाऊ सोमिनाथ ने दानिश ला जबर मारहाण करत चाकूचे वार केले. दरम्यान जखमींनी दानिशला घाटी रुग्णालयात नेताच पहाटे ३वा. दानिश चा मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक डाॅ गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहूल सूर्यतळ करत आहेत.