AurangabadNewsUpdate : विवाहितेने जाळून घेतले, दोघांना बेड्या

औरंगाबाद – मुकुंदवाडी अंबिकानगरात राहणार्या विवाहितेने नवरा व तिच्या ओळखीच्या तरुणाच्या जाचाला कंटाळून जाळून घेतले.या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी विवाहितेचा नवरा व मित्र अशा दोघांना अटक केली आहे.
सुनिता गणेश कांबळे (३०) अंदाजे रा.अंबिकानगर असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर गणेश कांबळे आणि आकाश शिंदे असे अटक आरोपींची नावे आहेत. नऊ वर्षापूर्वी सुनिताचा गणेश कांबळे शी विवाह झाला होता. तिचा मित्र आकाश शिंदे रा. आंबेडकरनगर हा तिला शरीरसुखाची मागणी करंत त्रास देत होता. हा प्रकार सुनिता चा पती गणेश कांबळे ला कळल्यानंतर त्याने सुनिताला आकाश शिंदे बाबत विचारले असता सुनिता ने ती कोणाशीही फोनवर बोलंत नसल्याचे सांगितले. सुनिता खोटं बोलंत असल्याचे लक्षात येताच गणेश कांबळे ने तिला मारहाण केली. याचा राग येऊन सुनिताने १मार्च रोजी डिझेल अंगावर ओतून स्वता:ला पेटवून घेतले. उपचार सुरु असतांना मयत सुनिता चा भाऊ माणिक प्रकाश रगडे (३४) याला सुनिताने घडलेला घटनाक्रम सांगितला.
दरम्यान ८मार्च रोजी सुनिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. माणिक रगडे च्या फिर्यादीवरुन गणेश कांबळे आणि आकाश शिंदे यांनी सुनिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले. वरील प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुदवाडी पोलिस करंत आहेत