“त्याने ” अनामत रक्कम भरण्यासाठी आणल्या चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणि पुढे ….

सोलापूर लोकसभा मतदारसंघात एका इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात प्रवेश केला खरा; परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम जमा करण्यासाठी त्याने आणलेल्या चलनी नोटा बंदी घातलेल्या जुन्या पाचशे व हजाराच्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला निवडणूक कार्यालयातून परत पाठविण्यात आले. वास्तविक पाहता बंदी घातलेल्या जुन्या चलनी नोटा बाळगणे हा कायद्याने गुन्हा असताना संबंधित व्यक्तीवर कारवाई न करता तसेच सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवडणूक अधिकारी कार्यालयात अनिल यशवंत पांढरे ऊर्फ पप्पू असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने आपणांस उमेदवारी अर्ज भरायचा आहे, असे सांगून प्रवेश केला. त्या वेळी तेथील बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी चौकशी करून त्या व्यक्तीला कार्यालयात सोडले. नंतर काही वेळातच ती व्यक्ती बाहेर आली. त्या व्यक्तीचा उमेदवारी अर्ज स्वीकारला गेला नाही. उमेदवारी अर्जासोबत भराव्या लागणाऱ्या अनामत रकमेसाठी त्याच्याकडील चलनी नोटा जुन्या पाचशे व हजाराच्या होत्या. या जुन्या चलनी नोटांवर बंदी आहे. अशा बंदी घातलेल्या जुन्या चलनी नोटा बाळगणे हादेखील कायद्याने गुन्हा ठरतो. त्याला निवडणूक कार्यालयातील संबंधित यंत्रणेने जागेवरच अटकाव कसा केला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारला गेला नाही, तेव्हा पप्पू पांढरे हे कार्यालयाबाहेर आले, तेव्हा तो आपल्याकडील चलनी नोटांमुळे घोटाळा झाल्याचे पुटपुटत होता. त्या वेळी त्याच्याकडे असलेल्या चलनी नोटा जुन्या व बंदी घातलेल्याच होत्या, हे दृश्य चित्रफितीत कैद झाले.
ती व्यक्ती निवडणूक अधिकारी यांच्या जवळची व माहितीतील असली पाहिजे.
Thanks for your comment . Keep in touch.