Maharashtra Budget 2021 : एका क्लिक वर जाणून घ्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील काही मोठ्या घोषणा ;
- महिलांच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत
- ग्रामीण तालुक्यातील शाळकरी मुलींना एसटी प्रवास मोफत, 1500 हायब्रीड बसची व्यवस्था
- परिवहन विभागाला 2500 कोटी, बस स्थानकांसाठी 1400 कोटी
- तीन लाखांपर्यंतचं पीक कर्ज वेळेत फेडल्यास शून्य टक्के व्याज
- पुण्यात रिंग रोडची घोषणा, 24 हजार कोटींचा निधी
- कोरोना संकटातील आरोग्य सेवेसाठी सात हजार कोटींचा निधी
- पुणे-नगर-नाशिक दरम्यान 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार
- सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारणार
- राज्यातील आठ प्राचीन मंदिरांचा विकास करणार
- राज्यात युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यास परवानगी, या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार
#Live | Maharashtra Budget 2021
3:10 PM | 08 MAR 2021
महाज्योती, सारथी, बार्टी या संस्थांसाठी प्रत्येकी दिडशे कोटी उपलब्ध करून देण्यात येतील, MPSC च्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद
3:07 PM | 08 MAR 2021
साखर व्यवसायाचा इतिहास व माहिती देणारे संग्रहालय पुण्यातील साखर संकुलात उभारण्यात येईल.
3:07 PM | 08 MAR 2021
निसर्ग पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन धोरण जाहीर करणार.
3:06 PM | 08 MAR 2021
घरकाम करणाऱ्या महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी संत जनाबाई यांच्या नावाने योजना, त्यासाठी 250 कोटी रुपये बीजभांडवलाची तरतूद : अजित पवार
3:04 PM | 08 MAR 2021
राज्यातील आठ मंदिरांचं संवर्धन करणार, पहिल्या टप्प्यात या मंदिरांसाठी 101 कोटींची तरतूद
3:01 PM | 08 MAR 2021
कोरोनाच्या काळातही राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक आली. विविध उद्योगांशी केलेल्या करारांच्या माध्यमातून राज्यात 1.12 लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक येणार आणि या माध्यमातून 3 लाख नवे रोजगार अपेक्षित आहेत.
3:00 PM| 08 MAR 2021
कोल्हापूर विमानतळाला नाईट लँडिंग आणि त्याचबरोबर सोलापूरच्या बोरामनी विमानतळाच्या क्षमता वाढीसाठीही भरीव निधी
2:58 PM | 08 MAR 2021
पुणे-नगर-नाशिक दरम्यान 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी 16 हजार 139 कोटींची तरतूद : अर्थमंत्री अजित पवार
2:58 PM | 08 MAR 2021
डोंबिवली, मिरा-भाईंदर, कोलशेत या ठिकाणी जेट्टी उभारणार : अर्थमंत्री अजित पवार
2:58 PM | 08 MAR 2021
मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम 2024 पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार.
2:54 PM | 08 MAR 2021
‘बर्ड फ्लू’ सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी पुणे येथे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारणार
2:54 PM | 08 MAR 2021
रस्ते विकासासाठी 12 हजार 950 कोटींच्या निधीची तरतूद, आपत्ती व्यवस्थापनासाठी 11315 कोटींची तरतूद : अजित पवार
2:52 PM | 08 MAR 2021
युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार
2:49 PM | 08 MAR 2021
वेरूळचे ऐतिहासिक महत्व जाणून पर्यटन वाढीच्यादृष्टीने नवे विमानतळ उभारणार, तसेच, पुण्यासाठी नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार. : अजित पवार
2:47 PM | 08 MAR 2021
जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी 3000 कोटींची तरतूद : अजित पवार
2:46 PM | 08 MAR 2021
ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास राज्यव्यापी योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने योजना, 1500 हायब्रीड बस उपलब्ध करून देणार, मोठ्या शहरात तेजस्विनी योजनेत अधिक बस उपलब्ध करून देणार : अजित पवार
2:44 PM | 08 MAR 2021
महिला दिनी मोठी घोषणा, राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, घर खरेदी करताना महिलेच्या नावाने घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार : अजित पवार
2:43 PM | 08 MAR 2021
घरकुल योजनेसाठी 6800 कोटींची तरतूद करण्यात आली. यातून गरिबांना हक्काचे घर मिळण्यास मदत होईल : अजित पवार.
2:38 PM | 08 MAR 2021
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद : अजित पवार
2:33 PM IST | 08 MAR 2021
पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार : अजित पवार
2:30 PM | 08 MAR 2021
बस स्थानकांच्या विकासाठी 1,400 कोटींची तरतूद, परिवहन विभागासाठी 2570 कोटींची तरतूद : अजित पवार
2:24 PM | 08 MAR 2021
जलसंपदा विभागासाठी 12,919 कोटींची तरतूद, पशुसंवर्धन व मत्स्य विभागासाठी 3,700 कोटींची तरतूद : अजित पवार
2:21 PM IST | 08 MAR 2021
गोसीखुर्द प्रकल्पासाठी 1 हजार कोटींची तरतूद, महत्वाच्या 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी : अजित पवार
2:19 PM | 08 MAR 2021
कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, पक्का गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणार, 2021- 22 कृषी पशु संवर्धन योजनेसाठी 3274 कोटी प्रस्तावित : अजित पवार
2:15 PM | 08 MAR 2021
एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणा, कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1,500 कोटींचा महावितरणला निधी, विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी : अजित पवार
2: 13 PM | 08 MAR 2021
3 लाख मर्यादा पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज : अजित पवार
2:12 PM | 08 MAR 2021
उद्योग सेवा क्षेत्रात घट झाली, कृषी क्षेत्रात 11% वाढ झाली आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणूण प्रयत्न केले : अजित पवार
2:11 PM | 08 MAR 2021
कोविड पश्चात प्रत्येक जिल्ह्यात उपचार केंद्र उभारणार, तसेच प्रत्येक रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणे लावण्यात येणार आहे : अजित पवार
2:08 PM | 08 MAR 2021
कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद; सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार: अजित पवार
2:07 PM | 08 MAR 2021
राज्यात आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद, नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार : अजित पवार
2:03 PM | 08 MAR 2021
कोरोनाच्या संकटाचे आव्हान देशासमोर आहे, जोडूनिया धन उत्तम व्यवहारे या प्रमाणे काम करावे लागत आहे : अजित पवार
2:01 PM | 08 MAR 2021 :
अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडत आहेत, सुरुवातीला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या