MaharashtraAssemblyUpdate : देवेंद्र फडणवीस यांचा तृतीयपंथीयाशी संबंध लावणारी पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा संबंध एका तृतीपंथीय व्यक्तीशी असल्याची पोस्ट एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने शेअर केली होती. या पोस्टचा उल्लेख अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधासभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पटोले यांनी केला. यावेळीस भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सभागृहात आवाज उठवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करून तात्काळ त्याला जेरबंद करण्याची मागणी केली. यालाच प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून अटक केली जाईल असं सांगितले.
देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले की, राष्ट्रवादीच्या चिंचवडच्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली. जर आमच्या पक्षाच्या लोकांनी सरकारविरोधात काही बोललं तरी देखील जेलमध्ये टाकलं जात. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता अशाप्रकारे पोस्ट लिहितो आणि त्याच्या साधी कारवाई केली जात नाही.
अशाप्रकारणे इथे बसलेल्या सगळ्यांविरोधात लिहिणे हे योग्य नाही आहे. जर खरंच सरकारमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर एफआयआर दाखल करावी आणि त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असो किंवा इतर पक्षाचा कार्यकर्ता असो, त्याने जर चुक केली आहे, तर आजच्या आज त्याच्यावर कारवाई करून अटक केली जाईल.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे एका तृतीयपंथीय व्यक्तीशी संबंध असल्याचा उल्लेख एका व्यक्तीने केला होता. यावरून भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यानी आपला विरोध दर्शवला होता.
काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनी विधानसभेत आज देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात एका पोस्टचा उल्लेख केला. एका वेबपोर्टल याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांचे एका तृतीयपंथी व्यक्तीशी संबंध होते अशी बातमी व्हायरल होतेय. त्यानंतर भाजपचे सदस्य यावर संतप्त झाले.” त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली भूमिका मांडली.ते म्हणाले, “राष्ट्रवादीचा चिंचवडच्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना कशाबाबतही जेलमध्ये टाकलं जातं. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर अद्याप कारवाई केली नाही. मी काय आहे जगाला माहिती आहे.”
फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर, अजित पवार बोलले ते म्हणाले, “त्या कार्यकर्त्यावर आजच कारवाई केली जाईल. त्याला अटक केली जाईल.”