Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पियोचे गौडबंगाल काय ?

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनचा साठा सापडला आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी अंबानी कुटुंबाला देण्यात आली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरु आहे. अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचे समोर आले आहे.

Advertisements

 

 


दरम्यान, या गाडीच्या मूळ मालकाची माहिती समोर आली आहे. 17 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन ठाण्यावरून संध्याकाळी आठच्या सुमारास मुंबईला येत होते. मात्र, विक्रोळी ऐरोली सिग्नल जंकशनजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर त्यांची 2014 ची मॉडेल असलेली स्कॉर्पिओ गाडी बंद पडली. ज्यानंतर मनसुख हिरेन यांनी गाडी तिथेच रस्त्याच्या बाजूला उभी केली.

Advertisements
Advertisements

दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता हिरेन त्यांची गाडी घेण्यासाठी आले तेव्हा ती गाडी तिथे नव्हती. ज्यानंतर हिरेन यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती तिथे सीसीटिव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्या रस्त्यावरचे पुढे आणि पाठीमागे असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपला तपास सुरू केला.

  • मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पियो कार आठवडाभरापूर्वी विक्रोळी येथून चोरीला गेली होती. या गाडीच्या चोरीची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

 

  • गाडीमध्ये काही बनावट नंबर प्लेट्सही आढळल्या आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये एकूण चार नंबर प्लेट आढळून आल्या आहेत. यापैकी एक नंबर प्लेट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने रजिस्टर आहे.

  • याप्रकरणी नागपूर कनेक्शन समोर आले  आहे. स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या कांड्यावर नागपूरच्या कंपनीचे  नाव आहे.

 

  • मागील एका महिन्यापासून मुकेश अंबानी यांच्या घराची रेकी केली जात होती, असे पोलीस तपासात समोर आले  आहे.

 

  • पोलिसांना कारमध्ये एक बॅग सापडली आहे. त्यामध्ये एक चिठ्ठी देखील सापडली आहे. बॅगवर ‘मुंबई इंडियन्स’ असे लिहिले आहे.
    चिठ्ठीत लिहिले की, नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या.

 

  • परवा (24 फेब्रुवारी) रात्री 1 वाजता ही स्कॉर्पिओ कार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील रस्त्यावर पार्क करण्यात आली होती.

 

  • हीच स्कॉर्पिओ कार त्याच रात्री 12.40 वाजता हाजी अली जंक्शन जवळ असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले आहे. 10 मिनिट ही गाडी तेथे उभी होती.

 

  • गाडी अँटिलिया बाहेर पार्क केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये म्हणून चालक गाडीच्या मागच्या दरवाजाने फरार झाला.
    मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथकं तैनात केली आहे. सध्या नऊ जणांची चौकशी देखील सुरु आहे.

 

  • कार उभी केल्यानंतर आरोपी सुमारे दोन तास गाडीतच बसून राहिला. यानंतर तो गाडीच्या मागच्या दरवाजाने उतरला, जेणेकरुन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणार नाही. ओळख पटू नये यासाठी त्याने आपला संपूर्ण चेहरा कपड्याने झाकला होता, सोबतच मास्कही लावला होता.

 

  • जिलेटिनच्या कांड्या कुठून चोरल्या गेल्या याची माहिती देणे कठीण, जिलेटिन कांड्यावर काहीही लिहिलेले नसते, सोलर इंडस्ट्रिज इंडिया लिमिडेटची माहिती. 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!