Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

बीड :  विशाखापट्टणम – कल्याण राष्ट्रीय महामार्गावरुनपुण्याच्या दिशेने जात असताना भरधाव कार पुलाखाली गेल्याने झालेल्या भीषण अपघातात पती -पत्नी जागीच ठार झाले. या अपघातातील मयत राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भाऊजी होते असे सांगण्यात येत आहे.

Advertisements

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरीजवळ सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.  ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. मात्र भरधाव वेगाने गाडी पुलाच्या खाली गेल्याने हा अपघात घडला. यामध्ये ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!