भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकर ; कवी वरवरा राव यांना 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर

महाराष्ट्राच्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील कवी वरवरा राव यांची प्रकृती बिघडल्याने मुंबई उच्च न्यायालयाने वरवरा राव यांना सहा महिन्यांसाठी सशर्त जामीन मंजूर केली आहे. 81 वर्षीय वरवरा राव यांना युएपीए कायद्याअंतर्गत अटक झाली होती. ते 28 ऑगस्ट 2018 पासून सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत.
न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने सांगितले की, जामीन मुदतीचे सहा महिने संपल्यानंतर वरवरा राव यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करायचे अथवा जामीन कालावधी वाढवून घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करायचा. कोर्टाने पुढे सांगितले की, वरवरा राव न्यायालयाच्या प्रक्रियेबाबत सार्वजानिक ठिकाणी कोणतेही जाहीर भाष्य करू शकत नाहीत. शिवाय जामीन कालावधीत ते कोणत्याही सह आरोपींशी संपर्क साधू शकत नाहीत.
दरवर्षी प्रमाणे 1 जानेवारी 2018 रोजीही लाखोंच्या संख्येने समुदाय महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव येथे विजय दिवस साजरा करण्यासाठी जमला होता. यावेळी अचानक हिंसाचार झाला आणि ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी अनेक वाहनं जाळण्यात आली होती. त्याचवेळी पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये अनेक डाव्या संघटनांचे नेते सहभागी झाले होते. पुढे पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव येथील झालेल्या दंगलीला एल्गार परिषदेतील सामाजिक कार्यकर्ते आणि नेते जबाबदार असल्याचे ठरवून अनेकांना अटक केली होती. याच गुन्ह्याचा ठपका वरवरा राव यांच्यावर आहे. हा जातीय दंगा खूपच भयानक होता. ज्यामुळे परिसरात कित्येक दिवस तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.