AurangabadNewsUpdate : कोरोनाची लस घेतल्यावरही बेगमपुरा पोलिसाचा मृत्यू

औरंगाबाद- कोरोनाची लस घेतल्यानंतरही बेगमपुरा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले भास्कर मेटे यांचा मृत्यू झाला.या घटनेचा अधिकृत अहवाल येणे बाकी आहे.
भास्कर मेटे यांनी एक आठवड्यापूर्वी लस घेतली होती. त्यानंतर दोन तीन दिवस त्यांनी कामही केले. पण त्यानंतर अचानक ताप आल्यावर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले.त्यांचे स्वॅब चे नमूने घेतले होते.अशी माहिती डाॅक्टरांनी दिली. उद्या अहवाल आल्यावर मेटे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली