आयात निर्यात व्यवसाय करणार्या महिलेची फसवणूक

औरंगाबाद -नव्यानेच आयात निर्यातचा व्यवसाय करणार्या जिन्सी परिसरातील महिलेची हँकर्स कडून १लाख ३७हजारांची फसवणूक झालीया प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात हँकर्स महिलेविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
संगीता राँय नामक महिलेने जनावरांसाठी लागणारी औषधी आयात करण्यासाठी रिजवाना (काल्पनिकनाव) यांना संपर्क केला.व औरंगाबादेत जनावरांसाठी लागणारी औषधी खूप लवकर विक्री होईल असे भासवत रिजवाना यांच्या कडून आँनलाईन १लाख ३७हजार रु.मागवले पण पैशे भरल्यानंतर संगीता राँय नामक महिलेचा फोन नाँट रिचेबल येत होता रिजवाना यांनी याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संपर्क केला असता त्यांनी हँक करण्यात आलेल्या साईटवर संपर्क केल्यामुळे हँकर्स ने फसवल्याचे तपासात उघंड झाले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश मयेकर करंत आहेत