Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पेट्रोल -डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई | कोरोनामुळे बिघडलेल्या आर्थिक संकटातून लोक सावरत असतानाच देशभरातील  नागरिक पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सामना करीत असतानाच आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर आज मध्यरात्रीपासून ५० रुपयांनी महागणार आहे. मुंबईत गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा भाव ७८९.५० रुपयांपर्यंत वाढला होता.

Advertisements

यापूर्वी १ डिसेंबर २०२० रोजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा सिलिंडर ५० रुपयांनी महागले. त्यानंतर ४ फेब्रुवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १६ फेब्रुवारीपासून सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे.

Advertisements
Advertisements

कोरोनाकाळात  देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. दरम्यान देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात. तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनंतर किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनिमय यानुसार कंपन्या किरकोळ विक्रीसाठी इंधन दर निश्चित करतात. देशभरात २८ कोटी ७० लाख एलपीजी ग्राहक आहेत.

नव्या आदेशानुसार आज मध्यरात्रीपासून मुंबईत गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. त्यामध्ये ५० रुपयांची वाढ होणार आहे. सध्या १४ किलोच्या अनुदानीत गॅस सिलिंडरची किंमत ७१९ रुपये आहे. त्यात मध्यरात्रीपासून ५० रुपयांची वाढ होणार आहे. एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा दर ७८९.५० रुपयांवर पोहोचला होता. त्यावेळी सिलिंडर आठशे रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती.मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!