Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : डॉक्टर सासऱ्याविरुद्ध सुनेचा बलात्काराचा आरोप , अटकपूर्व जमीन फेटाळला

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई । पती नपुंसक असल्याने डॉक्टर सासरा विशिष्ट प्रकारचे  इंजेक्शन देऊन बलात्कार करत असल्याची तक्रार केली होती.  या प्रकरणात  मुंबई उच्च न्यायालयाने  सासऱ्याचा अटकपूर्व जमीन नाकारला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलेवर बलात्कार करण्यासाठी तिचा पती आणि दीर देखील सासऱ्याची मदत करत होते. या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने  फेटाळला आहे.

Advertisements

पीडित महिलेने  केलेल्या तक्रारीनुसार, 2019 मध्ये तिचा विवाह ठरला. यानंतर सासरच्या लोकांनी तिच्या वडिलांवर हुंड्यासाठी प्रचंड दबाव आणला. वडिलांनी पैसे जमा करून सासरच्या लोकांना 20 लाख रूपये दिले आणि त्यानंतर त्याच वर्षी 8 जुलैला पीडितेचा विवाह झाला. मात्र, लग्नानंतर तिला आपला पती नपुंसक असल्याचे समजले. यानंतर आणखी हुंड्याची मागणी करत सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. 22 जानेवारी रोजी दीर, पती आणि सासरा तिच्या खोलीत गेले. पती आणि दीराने तिला धरून ठेवले आणि सासऱ्याने  जबरदस्तीने  तिला एक इंजेक्शन दिले  आणि तिच्यावर बलात्कारही केला.

Advertisements
Advertisements

या घटनेनंतर महिन्याभराने  सासरच्या लोकांनी तिला माहेरी पाठवले  आणि जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत तिला घरात घेणार नसल्याचे  सांगितले. यानंतर या सर्व गोष्टींना कंटाळून महिलेनं जून 2020 मध्ये पोलिसांत तक्रार दिली. न्यायाधीश कोतवाल यांनी याप्रकरणावर सुनावणी करताना म्हटले, की पीडितेनं एफआयआर नोंदवण्यास उशीर केला म्हणून तिचे आरोप खोटे आहेत असे  म्हणता येणार नाही. यासाठी विलंब का झाला, याच उत्तर संबंधित महिला देऊ शकते. महिलेने  केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याने  त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याविषयी आरोपींची चौकशी गरजेची असल्याने  त्यांना या टप्प्यावर संरक्षण देता येणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!