पोलीस निरीक्षकाने स्वत: वरच गोळी झाडून केली आत्महत्या

नवी मुंबई येथील एमएमसी पोलीस स्टेशनमध्ये दोन महिन्यांच्या रजे नंतर पहिल्या दिवशीच रूजू झालेल्या एका पोलीस निरीक्षकाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी ही घटना घडली. भूषण पवार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. भूषण पवार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. मागील 2 महिन्यांपासून ते रजेवर होते. दोन महिन्यांची रजा संपवून ते आज ड्युटीवर हजर झाले होते. त्यानंतर चौकशी करणाऱ्या खोलीत जाऊन त्यांनी पिस्तूलने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. भूषण पवार हे अत्यंत मनमिळावून स्वभावाचे होते त्यामुळे ते असे टोकाचे पाऊल उचलतील असे कुणालाच वाटले नाही. त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. भूषण पवार यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. एपीएमसी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.