Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

साताऱ्यात एसटी बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या चार शिवशाही बस जळून खाक

Advertisements
Advertisements
Spread the love

साताऱ्यात एसटी बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला आग लागली. या आगीत चार शिवशाही बस जळून खाक झाल्या आहेत. एका तरुणाने पार्क असलेल्या बसला आग लावली असल्याचे वृत्त आहे. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर पाच बसेनही पेट घेतला. यात एकूण ६ बस जळाल्या आहेत. अग्नीशमन दलाने ही आग सध्या नियंत्रणात आणली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Advertisements

पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. परिसरातील नागरिकांकडून घातपाताचा संशय वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बसच्या आसपास फिरत असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. या आगीत शिवशाही बस जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. “सायंकाळी जवळपास पाच वाजेच्या सुमारास शिवशाही बसेसला आग लागल्याची घटना घडली. एसटी महामंडळ, अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठे नुकसान टळले. अन्यथा आणखी गाड्यांचे नुकसान झाले असते”, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!