विवाहितेवर अत्याचार करणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी

औरंंगाबाद : स्वयंपाक करण्यासाठी घरात आलेल्या नातेवाईक विवाहीतेवर जबरदस्ती बलात्कार करुन कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बबुंदर उर्फ विकास धरमजीत पाल (वय ३१, रा. जामुल, नेवरी जि. सोनभद्र उ.प्र. ह.मु औरंगाबाद) याला छावणी पोलिसांनी गजाआड केले असून त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले आहेत.
या प्र्रकरणात २२ वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्यानूसार, पीडिताही पती व मुलांसह जानेवारी २०२० मध्ये शहरात काम करण्यासाठी आली होती. शहरातील एका म्हशीच्या गोठ्यात पीडिता व तीचा पती काम करित होते, व गोठ्याच्या मागील रुम मध्ये राहत होते. त्यांचा एक नातेवाईक देखील त्यांच्या शेजारील एका म्हशीच्या गोठ्यात काम करित होता, व तेथे राहत होता. ४ फेबु्रवारी २०२० रोजी दुपारी साडेबारा वाजता पीडितेचा पती हा गोठ्याची साफसफाई करित असतांना त्याने पीडितेला जेवण बनविण्यासाठी सांगितले. मात्र जेवण बनविण्यासाठी भांडी नसल्याने ती आरोपीच्या घरी गेली. तेथे आरोपीने पीडितेवर जबरदस्ती बलात्कार केला. व कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नारेगावात घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात
औरंंगाबाद : घरात कुटूंब झोपी गेलेले असतांना घराच्या भिंतीवरुन घरात प्रेवश करुन किचन मध्ये ठेवलेल्या पर्स मधील सोन्याचे दागिने, मोबाइल आणि रोख रक्कम असा सुमारे ३९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरणाऱ्याला सराईत चोरट्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.
शेख गफ्फार उर्फ बबलू शेख सत्तार (वय ३२, रा. चमचमनगर, नारेगाव) असे चोरट्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस आणि सहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल पोलिसांनी जप्त केले.
प्रकरणात शेख मुस्ताक शेख उमर (वय ४५, रा. आवेश कॉलनी, नारेगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, ६ फेबु्रवारी रोजी मुस्ताक यांच्या नातवाचा नामकरणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी ५ फेबु्रवारी रोजी मुस्ताक यांचे साडु शेख युसूफ व त्यांचे कुटूब देखील आले होते. रात्री सर्वजण जेवण करुन झोपी गेले असता चोरट्याने घराच्या भिंतीवरुन घरात प्रवेशकरुन किचन मध्ये झोपलेल्या मुस्ताक यांच्या मुलीच्या उशी जवळ ठेवलेल्या पर्स मधील सोन्याचे नेकलेस, रोख रक्कम आणि दोन मोबाइल असा ऐवज चोरुन नेला. सकाळी उठल्यावर घरात चोरी झाल्याची बाब उघडकीस आली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.