महावितरणचा लाचखोर वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या

औरंंगाबाद : नवीन घरासाठी विद्युत मीटर बसवून देण्याकरिता साडेचार हजारांची लाच स्विकारणा-या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.८) दुपारी चिकलठाणा एमआयडीसीत करण्यात आली.
तक्रारदाराला नवीन घरासाठी विद्युत मीटरची आवश्यकता होती. त्यामुळे तक्रारदाराने महावितरण कंपनीकडे अर्ज केला होता. चिकलठाणा ग्रामीणच्या सहायक अभियंता कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या विठ्ठल केशव धायगुडे याने तक्रारदाराकडे नवीन विद्युत मीटर बसवून देण्यासाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने धायगुडेविरुध्द अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने अॅन्टी करप्शन ब्युरोने सोमवारी सापळा रचून धायगुडेला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.