विनाक्रमांक कारमधील साधुने हिसकावली वृध्दाची सोनसाखळी

औरंगाबाद -विनाक्रमांक कारमधून प्रवास करणार्या साधूने रस्त्यावर उभे असलेल्या जेष्ठ नागरिकाला पत्ता विचारण्याचा बहाणा करंत आज सकाळी साडेआठ वा. त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चैन हिसकावली.या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चौघा अज्ञातांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
विष्णू दौलत चित्ते(६९) रा.एन५श्रीनगर काॅलनी असे फिर्यादीचे नाव आहे.चित्ते हे केंद्रीय सेवा उत्पादन खात्यातून निवृत्त झाले आहेत. आज सकाळी (४फेब्रू) ८.३०च्या सुमारास चित्ते हे माॅर्निंगवाॅक करत असतांना संत तुकाराम नाट्य गृहाच्या मागिल रस्त्यावर त्यांच्या मागून विनाक्रमांकाची एक पांढरी ह्यूंदई कार आली. चित्ते यांच्या जवळ थांबताच कमीशनर यादव आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा पत्ता विचारला.पत्ता सांगण्यासाठी चित्ते खाली झुकताच साधूने संधी साधंत चित्तेंची २लाख रुपयांची सोनसाखळी पळवली. घटनास्थळी पोलिसनिरीक्षक अशोक गिरी, पीएसआय बाळासाहेब आहेर यांनी पाहणी करंत तपासाची दिशा निश्र्चीत केली.व पुढील तपास सुरु केला आहे