#AurangabadCrimeUpdate: अखेर अक्रमला पाचोड परिसरातून पकडले

A controversial program which can turn your iphone into a fake gun ....
औरंगाबाद – २८जानेवारी रोजी किरकोळ कारणावरुन फायर करणार्या अक्रमला सिटीचौक पोलिसांनी पाचोड परिसरातून पकडून रात्री ९.३०वाअटक केली.
बुढीलेनपरिसरात राहणार्या अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार (२४) या सुताराच्या डाव्या मांडीत गोळी मारुन अक्रम नावाचा आरोपी फरार झाला होता. जखमी अब्दुलचा भाऊ अब्दुल रज्जाक याचे आणि राजा भंगारवाला यांचे गाडी रस्त्यात उभी करुन रस्ता अडवल्यामुळ मांडण झाले होते म्हणून राजा भंगारवाला चा ड्रायव्हर अक्रम ने अब्दुल सत्तार ला गोळी मारुन जखमी केले होते. दरम्यान राजा भंगारवालाने आरोपी अक्रम लाकर्नाटकात पळून जाण्यास मदत केली.तसेच अक्रमने या प्रकरणात अटकपू जामिन मिळवण्याचा प्रयत्न केला पण ते न जमल्यामुळे सिटीचौक पोलिसांनी अक्रमला पाचोड परियरातून पकडून आणले पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे व पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिटीचौक पोलिसांनी कारवाई पार पाडली.