बुथ बंदोबस्तावरील पोलिस कर्मचार्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

औरंगाबाद – पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी संजय इंगळे यांचा मूरमी परिसरात ग्रामपंचायत निवडणूकांच्या बूथ बंदोबस्तावर असतांना आज संध्याकाळी (१४ जाने)हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या सोबत असलेल्या इतर कर्मचार्यांनी त्यांना ताबडतोब सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली असे डाॅ.उन्मेष टाकळकर यांनी तपासून सांगितले. तसेच जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती पोलिस निरिक्षक संतोष पाटील यांनी दिली आहे.