वाढत्या चोऱ्या – घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांची रात्र गस्त वाढवली ; वाहन एकाच ठिकाणी थांबल्यास होणार कारवाई

औरंंगाबाद : गेल्या काही दिवसापासून शहरात चोऱ्या आणि घरफोड्याचे सत्र वाढले असून चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची रात्र गस्त वाढविण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी दिले आहेत. तसेच गस्तीवरील वाहन एकाच ठिकाणी दहा मिनिटापेक्षा अधिकवेळ थांबल्यास गस्तीवरील कर्मचाNयांवर कारवाई करण्याच्या सुचना देखील त्यांनी दिल्या असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या काळानंतर शहरात चोऱ्या आणि घरफोड्याचे सत्र वाढले आहे. तसेच वाहन चोऱ्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली असल्याने वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी विविध पोलिस ठाण्याच्या गस्तीवरील (पेट्रोलिंग) वाहनांना रात्रीची गस्त वाढविण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ.गुप्ता यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे गस्तीवरील वाहने एकाच ठिकाणी दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबल्यास गस्तीवरील वाहनांत असलेल्या कर्मचाऱ्यायांना नियंत्रण कक्षाला खुलासा द्यावा लागणार आहे. खुलास्याचे कारण न पटल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देखील पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, पोलिस आयुक्तालयातील सर्वच वाहनांना जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टिीम) लावण्यात आली आहेत, त्यामुळे गस्तीवरील वाहन एकाच ठिकाणी किती वेळ थांबले होते याची नोंद पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात होते. त्यामुळे रात्रगस्तीवरील कर्मचार्यांना डोळ्यात तेल घालून रात्रीच्या वेळी गस्त घालावी लागणार आहे.