Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : अवैध प्रेमाच्या आहारी जावून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांने केली स्वतःच्या मुलाची हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

नाशिकमध्ये जनरल वैद्यनगर परिसरात एका वडिलाने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडील त्यांची जमीन त्यांच्या प्रेयसीच्या करत होते. दरम्यान याला कुटुंबीयांनी विरोध केला. यातून झालेल्या वादातून पित्याने आपल्या मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. आरोपी पित्याला  पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.c
प्रभाकर माळवाड असे संबंधित आरोपीचे नाव आहे. माळवाड यांनी आपल्या 28 वर्षीय पोटच्या मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. या झटापटीत मृत मुलाची आई जयश्री माळवाड यांनी विरोध केला असता तिलाही आरोपीने मारहाण केली आहे. आरोपी प्रभाकर हा देवळा सरकारी पशुसंवर्धन दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. त्याचे बाहेर एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यातूनच हा वाद झाला. आई जयश्री यांच्या फिर्यादीनंतर आरोपी प्रभाकर माळवाडला पोलिसांनी अटक केली आहे.
झाले असे की, आरोपी प्रभाकर माळवड हा देवळा सरकारी पशुसंवर्धन दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. या अवैध प्रेमाच्या आहारी जावून त्यांनी त्यांची जमीन संबंधित महिलेच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. याला 28 वर्षीय मुलगा निलेशने विरोध केला. यातून हा वाद वाढत गेला आणि या वादाचे रुपांतर हत्येत झाले.
आपल्या प्रेयसीच्या नावावर जमीन करण्याच्या हट्टापायी आरोपीने आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतला आहे. यावेळी झटापटीत मृत मुलाच्या आईने विरोध केला, तिलाही निर्दयी आरोपीने मारहाण केली आहे. याप्रकरणी मृत मुलाच्या आईने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!