लोकसभा २०१९ : वंचित आघाडीबरोबरच राज्यात सपाचे ४, बसपचे ४४ उमेदवार लढणार

काँग्रेस महाआघाडी समोर आधीच प्रकाशआंबेडकर आणि ओवैसी यांच्या यांच्या वंचित बहुजन आघाडीचे आव्हान असताना बसपा आणि सपाने आपले ४८ उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने मोठा कठीण प्रसंग उद्भवला आहे.यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येऊन राज्यातील ४८ जागा लढण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही पक्षांत झालेल्या जागावाटपानुसार सपा उत्तर पश्चिम मुंबई, भिवंडी, बीड आणि नांदेड अशा चार मतदारसंघांत लढणार आहे. र्वरित ४४ ठिकाणी बसपचे उमेदवार असतील, असे बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी शुक्रवारी सांगितले. दोन्ही पक्षांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसप आजपर्यंत प्रत्येक निवडणूक स्वतंत्रपणे लढवत आली आहे. तथापि, उत्तर प्रदेशात सपा आणि बसप यांची आघाडी झाली असून, दोन्ही पक्षांनी संघटितपणे आघाडीद्वारे निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बसप उमेदवारांची नावे निश्चित झाली असून, हायकमांडच्या निर्देशानंतर ती जाहीर करण्यात येतील, असे बसपच्या सूत्रांनी सांगितले.
महानायक ऑनलाईन अतिशय ठळकपणे चालु घडामोडींचा वेगवान व निरपेक्षपणे आढावा घेत आहे..।
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..।
Thanks . keep in touch …