IndiaNewsUpdate : ममता बॅनर्जी यांच्या आरोपाला असदुद्दीन ओवेसी यांनी दिले असे उत्तर

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोप केले जात आहेत . दरम्यान. ही निवडणूक लढणार असल्याची घोषणा एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी हैदराबादहून एका पक्षाला आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, असे वक्तव्य केल्यानंतर ममतांच्या वक्तव्याला उत्तर देताना , ‘असदुद्दीन ओवेसीला विकत घेऊ शकेल असा कुणी जन्मला आलेला नाही. आणि मुस्लिम मतदार हि ममतांची जहागिरदारी नाही’, असे म्हटले आहे.
Never was a man born who can buy Asaduddin Owaisi with money. Her allegation is baseless and she is restless. She should worry about her own home, so many of her people are going to BJP. She has insulted the voters of Bihar and the people who voted for us: Asaduddin Owaisi, AIMIM https://t.co/mT1fe7piii pic.twitter.com/8rfWq5eSk3
— ANI (@ANI) December 16, 2020
ममता बॅनर्जींचे आरोप बिनबुडाचे आहेत आणि त्या बेचैन अस्वस्थेतून असे आरोप करत आहेत. त्यांनी आधी आपल्या घराची चिंता करावी. त्यांच्या पक्षातील किती नेते भाजपमध्ये जात आहेत, हे बघावं. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला मतदान करणाऱ्यांचा नागरिकांचा अपमान ममतांनी केला आहे, असं ओवेसी म्हणाले.
बिहार निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्यावर आता एमआयएमने पश्चिम बंगालची विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाललगतच्या बिहारमधील सीमांचल भागात पाच जागा जिंकल्या. या भागात बहुसंख्य मुस्लिम मतदार आहेत. जलपाईगुडीतील एका सभेत ममता बॅनर्जींनी ओवेसींच्या एमआयएमवर निशाणा साधला. ‘मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी हैदराबादमधील पार्टी आणण्यासाठी भाजप कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. भाजप हिंदू मतं खाणार आणि हैदराबादचा पक्ष मुस्लिम मतं खाईल अशी यांची योजना आहे. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीतही त्यांनी हेच केलं. हा पक्ष भाजपाची B टीम आहे, अशी टीका ममतांनी केली.
ओवेसी ट्विट करत ममतांच्या टीकेला उत्तर दिलं. ‘आतापर्यंत तुम्ही आदेश ऐकणाऱ्या मीर जाफर आणि सादिकांशी व्यवहार केला आहे. पण आपल्यासाठी बोलणारे आणि आपला विचार करणारे मुस्लिम तुम्हाला आवडत नाहीत. तुम्ही बिहारच्या मतदारांचा अपमान केला आहे. बिहारमधील पराभवासाठी मतांच्या विभाजनाला दोष देणाऱ्यांचं काय झालं ते आठवा. मुस्लिम मतदार ही काही तुमची जहागिरदारी नाही, असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.