AurangabadNewsUpdate : एस.टी. महामंडळात बोगस खाते उघडून अपहार, अटकेतील एका आरोपीसह पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा

औरंगाबाद – तीन सेवा निवृत्त कर्मचार्यांच्या नावात साम्य असणारे बोगस खाते एस.टी. महामंडळाच्या को आॅपरेटिव्ह बॅंकेत उघडून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पाच जणाविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आज १५डिसैं रोजी दाखल झाला आहे.
२०१८पासून एस.टी. महामंडळाच्या बॅंकेत अशा पध्दतीने अपहार सुरु असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.या गुन्ह्यातील एक आरोपी सध्या सेवानिवृत्त कर्मचार्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगंत आहे.
काजी अतिकौद्दीन (३५) रा. कटकटगेट धंदा. कारकून एस.टी. महामंडळ असे अटक आरोपीचे नाव आहे. क्रांतीचौक पोलिसांनी काजी अतिकोद्दीन ला फसवणूकीच्या दुसर्या गुन्ह्यात ट्रान्सफर करुन घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तर इरफान साजिद कुरेशी, शफीक मलंगशहा कादरी दोघेही रा. हर्सूल, शेख शमशेर शेख इब्राहिम रा. बिलोली नांदेड आणि बनावट बॅंकखाते तयार करण्यास मदत करणारे कर्मचारी या चौघांवर फक्त गुन्हा दाखल झाला आहे.
काजी अतिकने मुजीबखान नावाच्या सेवानिवृत्त कर्मचार्याच्या ४लाख५० हजार रु.चा अपहार केल्याचा गुन्हा जुलै २०२०मधे दाखल झाला आहे. मयत मुजीबखानला काजी अतिकोद्दीन ने केलेला प्रकार कळल्यामुळे मुजीबखान काजीकडे सतत पैशाची मागणी करंत असे मुजुबखानला पैसे दिल्यास वरील प्रकरण उघडकीस येईल म्हणून काजी ने एका मजूराला सोबंत घेत मुजीबखानचे मुंडके धडावेगळे करंत खून केला होता. तर उर्वरित चार आरोपी क्रांतीचौक पोलिसांच्या तपासात आज उघंड झाले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल देवकर करंत आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांनी दिली.