वंचित बहुजन आघाडी : बाळासाहेब आंबेडकर सोमवारी सोलापुरातून उमेदवारी अर्ज दाखल करणार : सुजात आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात सोलापुरातून लढणार असल्याचे त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी ए बी पी माझा ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले असून सोमवारी २५ मार्च रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या मतदार संघाची जबाबदारी सुजात आंबेडकर स्वतः सांभाळत आहेत . तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्यावर अकोल्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे . आमच्या तिघांची महिनाभरापासून एकत्रित भेट नसल्याचे सुजात म्हणाला. वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी दलित , मुस्लिम वंचित बहुजन तरुण मोठ्या प्रमाणात असून लोक स्वतःहून आघाडीचा प्रचार करीत असल्याचेही त्याने सांगितले .
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्यावतीने प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी १९ मार्चला नामाकंन घेतला आहे. त्यामुळे प्रा. अंजलीताई आंबेडकर अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.
सुजात आंबेडकर सध्या सोलापुरात तळ ठोकून असून वंचित बहुजन आघाडीच्या आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या नियोजन बैठका चालू आहेत. सोलापूर जिल्ह्यात नियोजनाची त्यांच्यावर जबाबदारी असून ते अधिक परिश्रम घेत आहेत. एबीपीमाझाशी त्यांनी अतिशय सविस्तर मुलाखत देऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका बिनदिक्कत विषद केली. सुजात आंबेडकर यांनी राज्यशास्त्राचे आणि पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. राहुल देशपांडे यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सुजात यांनी अतिशय समर्पकपणे देण्याचा प्रयत्न करून आपली चुणूक दाखवली