IndiaCrimeUpdate : धक्कादायक : पतीसमोरच “त्या ” १७ नराधमांनी विवाहितेवर केला सामूहिक बलात्कार

आठवड्याचा बाजार करून पतीसोबत घरी परतणाऱ्या महिलेवर पतीसमोर १७ जणांनी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. झारखंडमधील डुमका येथे ही घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून इतर १६ जण फरार आहेत. पीडित महिला ३५ वर्षांची असून पाच मुलांची आई आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सदर पीडित महिला आपल्या पतीसोबत बाजारातून परतत असताना या १७ आरोपींनी त्यांना अडविले. ते सर्व दारुच्या नशेत होते. त्यांच्यापैकी पाच तरुणांनी पतीला धरून ठेवले आणि तिला ओढत जवळच्या झाडीत नेले आणि तिच्यावर रात्री १२ पर्यंत आळीपाळीने बलात्कार कला. आणि कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देत घटनस्थळावरून पसार झाले.
पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. इतर १६ आरोपी फरार आहेत. डीआयजी सुदर्शन मंडल यांनी एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही असं सांगितलं आहे. पोलीस निरीक्षक नवलकिशोर सिंह अधिक तपास करीत आहेत. या आधीही दुमका येथे एका तरुणीवर १७ तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती. या सर्व आरोपींना पोलिसांनी तुरुंगात पाठवले आहे. त्यात हि घटना घडली आहे.