कमी भावात चिकन विक्री, चिकन विक्रेत्याकडून खुनाचा प्रयत्न

मंगळवारी रात्री १०वा. औरंगाबाद येथील, एपीआय कॉर्नर जवळील उड्डाणपुलाखाली, एका चिकन विक्रेत्याने कमी भावात चिकन विकून, जास्त विक्री करणार्या चिकन विक्रेत्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मौहम्मद फिरोज अब्दुल हमीद कुरेशी(२१) असे हल्ल्यामधे गंभीर जखमी झालेल्या चिकन विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्या शेजारी चिकन विक्री करणारे लियाकत, सोहेल व नन्हा कुरेशी यांनी लोखंडी रॉडने हल्ला चढवून फिर्यादीला गंभीर जखमी केले. फिर्यादी हा आरोपींपेक्षा कमी भावात चिकन विक्री करत होता. हल्ला करताच आरोपी फरार झाले. पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कोपनर पुढील तपास करत आहेत.