JalnaNewsUpdate : अंबड तालुक्यात ७१ किलो गांजा पोलिसांकडून जप्त , आरोपीला अटक

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रवना शिवारातील एका शेतात गांजाचे झाडे असल्याच्या माहितीवरून आज 28 नोव्हेंबर रोजी दुपारी अंबड पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात 71 किलो गांजा जप्त करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गुलाबराव भगवानराव माने असे आरोपीचे नाव आहे.
अंबड तालुक्यातील रवाना येथील गुलाबराव भगवानराव माने यांच्या शेतात कपाशीच्या पिकात गांजाची झाडे लावलेली असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी पोलीस पथकासह या शेतावर आज दुपारी धाड टाकली. कपाशीच्या पिकात असलेल्या तुरीच्या पाट्यामध्ये लावलेली 58 गांजाची झाडे आढळून आली. तसेच, त्याठिकाणी असलेल्या पत्राच्या शेडमध्ये ठेवण्यात कापसाच्या गंजीत साठवून ठेवलेला दोन गोण्यातील साडेतीन किल्लो वाळलेला गांजा आढळून आला. या कारवाईत ओला गांजा 68 किल्लो आणि वाळलेला गांजा साडेतीन किल्लो, असा एकूण 71 किल्लो 500 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.