AurangabadCrimeUpdate : प्रिया शरणजीतस्वामींच्या आश्रमावर हल्ला करुन मारहाण करणारे दरोडेखोर जेरबंद

औरंगाबाद- गेल्या ११नौव्हेंबर रोजी प्रिया शरणजीतस्वामींच्या आश्रमावर हल्ला करुन मारहाण करणार्या नऊ दरोडेखोरांच्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून एक इनोव्हा,एक इटोस आणि ७ मोबाईल असा १४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल आहे.
राधेशाम ऊर्फ राजा रामराव चिखले(३२)पुंडलिकनगर,बाळू बापू चव्हाण(४२) राजेश भालकर उर्फ विठ्ठल सोळंकी२०) दोघेही रा. करोडी,बलवान (२५) आणि भीमसिंग चैनसिंग पवार (३०), कुलदीप डडणसिंग पारधी(२०) मुरादपुर जि.गुना मध्यप्रदेश, हल्ली मु. वंजारवाडी तांडा औरंगाबाद हेमराज करणसिंग सोनार (१९) रा. सावंगी तुळजापूर शिवार, रामप्रसाद गणपत चव्हाण (३७) रा. जिंतूर ता परभणी, कृष्णा उर्फ बाळू धोंडिराम दहिवाळ (२५) रा. बाजीउमरद जालना अशी अटक दरोडेखोरांची नावे आहेत.हे रेकाॅर्डवरचे गुन्हैगार असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.
गेल्या ११नोव्हेंबर रोजी फुलंब्री तालुक्यातील सताळा शिवारात राधागोविंद सेवामिशन आश्रमाचे प्रमुख प्रिया शरणजीतस्वामी मूळ नाव यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर(६१) रा फतेहपुर शेखावरी जि शिखर राजस्थान यांना त्यांच्या शिष्यगणासहित गंभीर जखमी केले होते. अटक आरोपींनी पोलिसांना कबुली दिली की, शरणजीतस्वामी महाराजांकडे प्रचंड संपत्ती आश्रमात लपवलेली असल्यामुळे दरोडेखोरांनी हल्ला केला.पण शरणजीतस्वामी आणि त्यांच्या साधकांनी जोरदार प्रतिकार केल्यामुळे दरोडेखोर पळाले. हा आश्रम चौका गावाच्या डोंगरात असल्यामुळे दरोडेखोरांनी १०नोव्हेंबर रोजी आश्रमात जाऊन रेकी केली असल्याचे व नंतर हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले. वरील कारवाई पोलिस निरीक्षक भागवत फुंदे,पीएसआय गणेश राऊत, संदीप सोळंके,एऐसआय सय्यद झिया, वसंत लटपटे,जीवन घोलप, सुरेखा वाघ यांनी पार पाडली.