Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : सोशल मिडिया वरील प्रेमाच्या शोधात “ती” औरंगाबादला आली पण गॅरेज मालकाच्या सावधगिरीमुळे सुखरुप परत गेली…

Spread the love

औरंगाबाद – कोलकत्याहून हावडा-नागपूर- अकोला -औरंगाबाद असा प्रवास करंत आपल्या सोशल मिडियावरील प्रियकराला भेटण्यास आलेली अल्पवयीन प्रेयसी गॅरेज मालकाच्या सावधगिरीमुळे आपल्या पालकांसोबत संध्याकाळी ७.३०च्या फ्लाईटने लोहगाव विमातळाहून बेंगलोरला रवाना झाली. यामध्ये पुंडलिक नगर पोलीसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांचे झाले असे की,   सुप्रिया (नाव बदलले) हिचे औरंगाबादेतील आनंद दत्ता मोहोरे (२३) रा. ठाकरेनगर याच्या सोबंत सोशलमिडीयाहून मैत्री झाली.त्या मैत्रीतून तो तिला आवडायला लागला. त्यामुळे तिनेमागचा पुढचा विचार न करता आपला मोबाईल बंद करुन दुसरे कार्ड घेतले व २०नोव्हेंबर रोजी हावडा मार्गे औरंगाबादेत काल सकाळी दाखल झाली. सरळ आनंदाकडे गेली. आनंद ज्या गॅरेज मधे कामाला आहे. त्या साई गॅरेज चे मालक रविंद्र सरोदे हे असून त्यांना हा वेगळाच प्रकार असल्याचे लक्षात आले. दरम्यान कोलकत्याला मुलगी अरविंदबासु नगरात राहात असून ती अल्पवयीन असल्यामुळे बासूनगरातील सरसोना पोलिस ठाण्यात २२नोव्हेंबरला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.सरसोना पोलिसांनी सुप्रियाचे सोशलमिडीया अकाऊंट चेक करण्यास सुरुवात केली. तेंव्हा तिचे औरंगाबादेतील आनंदाशी प्रेम जुळल्याचे लक्षात आले. आनंदाचा पत्ता फेसबुकवर शोधला असता तो ठाकरे नगरातला निघाला.कोलकता पोलिसांनी ठाकरे नगरातील हद्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात येत असल्याचे शोधले व एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्याशी संपर्क करंत आनंद माहोरे चा पत्ता दिला.एपीआय सोनवणे यांनी साई गॅरेजवर शोध घेतला असता.ती मुलगी गॅरेज मालकाने स्वता:च्या घरी सांभाळून ठेवली होती. सोनवणे यांनी मुलीचे तिच्या आई वडलांसोबंत बोलणे करुन दिले.वडलांनी त्यांच्या बहीणीला हा प्रकार सांगितल्यावर ती तिच्या पती सोबंत बेंगलोरहून पुण्याला व पुण्याहून बाय कार औरंगाबादेत दाखल झाले. मुलीला आत्याकडे सोपवल्यानंतर सगळ्यांचेच डोळे आनंदानाने डबडबले.सोनवणे यांनी दुपारी दोन वा सुप्रियाला आत्याच्या हवाली केले.आत्या तिला घेऊन पुण्यात लोहगाव विमातळाकडे निघाली असून ७.३० ला तिची फ्लाईट असल्याचे पोलिसांना कनफर्म झाले. हा घटनाक्रम कोलकता पोलिसांना सांगून सगळ्यांनी सुटकेचा निश्र्वास सोडला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!