AurangabadCrimeUpdate : निलंबित कारकुनाकडून सुशिक्षित बेकारांना अंदाजे एक कोटीचा गंडा, कारकूनाला बेड्या

औरंगाबाद: तरुणांना रेल्वेत स्पोर्टच्या कोट्यातून नौकरी लावून देण्याचे अमिष दाखवत दिल्ली, बिहार या ठिकाणी फिरवून आणंत लाखो रु.उकळणार्या भामट्याला गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या.त्याला कोर्टाने २७नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी वैद्य हा नाशिक येथील शासकिय अंध महाविद्यालयात कारकून होता. काही दिवसांपूर्वीच त्याला निलंबित केले आहे.
अशोक साहेबराव वैद्य (२९) रा. हर्सूल असे अटक आरोपीचे नावआहे. गेल्या काही वर्षांपासुन जवाहरनगर, गुन्हेशाखेकडे वैद्य च्याविरोधात फसवणूकीच्या तक्रारी आल्या होत्या. एपीआय अजबसिंग जारवाल यांनी आरोपी वैद्यला काल दुपारी जवाहरनगर पोलिस ठाण्यात चौकशीला बोलावले.दिवसभर कसुन चौकशी केल्यावर वरिष्ठांच्या आदेशाने रात्री उशीरा वैद्यला अटक केली. या मागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अशोक साहेबराव वैद्य (रा.हर्सूल परिसर, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, योगेश मोरे वय-25 (मुकुंदवाडी, औरंगाबाद) या तरुणाने फिर्यादीत म्हणटले आहे की, सन 2019 मध्ये त्याची ओळख आरोपीशी झाली होती, त्या नंतर त्याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचे अमिश दाखवले व त्यासाठी 10 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले, या अमिषला योगेश बळी पडला त्यासह त्याचा जाधव नावाचा एक मित्र देखील या आरोपीच्या अमिषला बळी पडला, दोघांनी आरोपीच्या खात्यात ऑनलाइन आणि बँकेतून अगोदर पन्नास हजार रुपये भरले व त्या नंतर जाधव आणि मोरे या दोघांना आरोपीने दिल्लीला बोलावले व आरोपी वैद्य हा स्वतः विमानाने दिल्लीत पोहोचला तेथे आरोपीने दोघांना रेल्वे मंत्रालयात घेऊन गेला व एका व्यक्तीची भेट घालुन ती व्यक्ती रेल्वे मंत्री यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगितले, व दोघांचे रेल्वे खात्यात स्पोर्ट्स कोट्यातून काम होऊन जाईल असे सांगितले. व त्या नंतर दोघांकडून प्रत्येकी पाच- पाच लाख रुपये घेतले व दिनांक 26 फेब्रुवारी 2019 रोजी दोघांनाही आरोपीने नोकरीचे बनावट ज्वाइनिंग लेटर दिले. त्या नंतर महिनाभरानंतर लोकसभेची आचारसंहिता लागल्याचे कारण सांगत आरोपीने वेळ मारून नेली. त्या नंतर देखील अनेक महिने आरोपीने टाळाटाळ केल्याने दोघांनाही संशय आल्याने त्यांनी खातरजमा केली असता ते बनावट नियुक्ती पत्र असल्याचे समजताच मोरे यांनी त्याकडे पैशाचा तगादा लावला तरुणाने भरलेल्या त्या पैशा मधील सुमारे चार ते पाच लाख आरोपीने तरुणाला परत केले मात्र त्या नंतर आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरू केल्याने तरुणाने पोलीस ठाणे गाठत जवाहर नगर ठण्यात तक्रार दाखल केली. आरोपी वैध हा जालना रोडवरील युथ असोसिएशन युथ इंटरनॅशनल स्काऊड अँड गाईड चे कार्यालय चालवत असे, गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली असून या गुन्ह्यात मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून हे प्रकरण आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
——————————
तरुणांना दिल्लीत 15 दिवस प्रशिक्षण..
मोरे आणि जाधव या दोन्ही तरुणांना बनावट नियुक्तीपत्र दिल्यानंतर दिल्लीती बोलावले व तेथे एका ठिकाणी त्यांना ठेवण्यात आले व प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांना 15 तेथेच ठेवण्यात आले होते. तरुणांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रावर युथ असोसिएशन युथ इंटरनॅशनल स्काऊड अँड गाईड कार्यालयचा शिक्का मारलेला आहे.त्यामुळे आरोपी या कार्यालयाचा वापर तरुणांना गंडविण्यात करीत असावा अशी देखील शक्यता आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजय ,सूर्यवंशी पोलिस कर्मचारी महेश उगले,विठ्ठल मानकापे करंत आहेत