AurangabadCrimeUpdate : कमालच झाली !! चोरट्यानी चक्क एटीएमचे मशीनच उखडून नेले… !!!

पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाळूज औधोगिक वसाहतीतील एटीएम मशीन उखडून नेण्याचा प्रयत्न 10 दिवसांपूर्वी फसला होता मात्र आज पहाटे ग्रामीण भागातील इंडिया बँकेचे रोकड सहित एटीएम चोरट्यानी लंपास केले असून त्या मध्ये लाखोंची रोकड असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना औरंगाबाद- पैठण रस्त्यावरील ढोरकीन च्या बाजारपेठेत घडली.या दोन्ही घटनेमुळे चोरट्यानी थेट शहर आणि ग्रामीण आशा दोन्ही पोलिसांना आव्हान दिले आहे.
या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद- पैठण रस्त्यावर असलेल्या ढोरकीन गावाच्या मुख्य बाजारपेठेत इंडिया बँकेचे एटीएम सेंटर आहे.गुरुवारी दुपारीच या सेंटर मध्ये बँकेच्या अधिकारी यांनी रोकड भरली होती. पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पैठण पोलिसांनी या ठिकाणी भेट दिली होती.मात्र पोलीस भेट देऊन जाताच चोरट्यानी एटीएम सेंटर ला लक्ष केले.चोरांनी एटीएम मशीन न फोडता थेट ती मशीनच उखडून नेली. आज पहाटे माहिती मिळताच एमआयडीसी पैठण पोलीस, एल.सी.बी.चे पथक, ठसे तज्ञ, डॉग स्कॉड सह विविध पथकांनी घटनस्थळी गाठत सॅम्पल गोळा केले. पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून वृत्त मिळे पर्यंत बँकेचे अधिकारी घटनस्थळी दाखल झालेले न्हवते त्यामुळे नेमकं एटीएम मशीन मध्ये कितीची रोकड होती हे स्पष्ट होऊ शकले नाही.मशीन ही अवजड असल्याने चोरी मध्ये किमान चार ते पाच चोरट्यांचा समावेश असून रोकड भरलेले एटीएम घेऊन जाण्यासाठी एखाद्या लोडिंग वाहनाचा वापर करण्यात आला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
—————————
सव्वा वर्षपूर्वीही बीडबायपासवर अशीच चोरी..
13 जुलै 2019 रोजी पुंडलिकनगर पोलीस ठाणे हद्दीतील बीडबायपास रस्त्यावरील एक एटीएम सेंटर मधील रोकड सहित मशीन चोरट्यानी लंपास केली होती त्या मध्ये सुमारे 24 लाख रुपये होते. तर त्या घटनेच्या चोवीस तासाच्या आत छावणी पोलीस ठाणे अंतर्गत पाडेगाव नजीक असलेल्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न एका वयोवृद्धीच्या प्रतिकारा नंतर फसला होता,या गुन्ह्यातील आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्याप ही यश मिळालेलं नाही.त्यातच आज दुसरी घटना घडल्याने शहर आणि ग्रामीण पोलिसा समोर या तरबेज चोरट्यानी आव्हान उभे केले आहे.
——————————
10 दिवसांपूर्वी फसला होता प्रयत्न..
11 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत असलेले रांजणगाव जवळील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर मधील रोकड भरलेली मशीन चोरट्यानी उखडली होती मात्र ती अवजड असल्याने आणि दरवाज्यात अडकल्याने चोरांनी ती तेथेच सोडून पळ काढला होता.या प्रयत्नानंतर आजची घटना घडली या दोन्ही घटनेतील आरोपी एकच असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.