AurangabadCoronaUpdate : राज्यात आढळले ५०११ नवे रुग्ण , ६६०८ रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज 5011कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6608 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1630111 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 80221 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.75% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 18, 2020
आज राज्यात तब्बल १०० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ४६ हजार २०२ इतकी झाली आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये करोनाचा संसर्ग उतरणीला आला आहे. राज्यातील नवीन करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी राज्यातील करोना मृतांची संख्या मात्र अद्याप कमी होताना दिसत नाहीये. राज्यातील मृत्यूदरही २. ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील करोना मृतांचे प्रमाण अटोक्यात आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळत आहे.
आज राज्यात ६ हजार ६०८ रुग्णांनी करोनावर मात केली असून राज्यातील एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ३० हजार १११ इतकी पोहोचली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेटही ९३ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. आज शासनानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९२. ७५ टक्के इतका झाला आहे. तर, ९९ लाख ०० हजार ८७८ चाचण्यांपैकी १७ लाख ५७ हजार ५२० चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत.
आज राज्यात ५ हजार ०११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १७ लाख ५७ हजार ५२० इतकी झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. आज ८० हजार २२१ अॅक्टिव्ह रुग्ण राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.