MaharashtraNewsUpdate : “व्हीबीए”चे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही अतिवृष्टी भागाचा दौरा, राज्य आणि केंद्र सरकारवर टीका

Advertisements
Advertisements
Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले कि , ‘तीन पायाचं सरकार त्यातील एक किंवा दोन पाय तिसऱ्या पायाला दबाव टाकत आहेत. कुठल्याही पद्धतीने अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करू नये आणि साखर कारखान्यांना आपल्याला अनुदान जाहीर करायचे आहे. ओला दुष्काळातील लोकांना मदत न करता साखर कारखान्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आमचा आरोप आहे,’ असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघात केला आहे.

Advertisements

प्रकाश आंबेडकर  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाले कि ,  ‘मोदी हा देशाचे पंतप्रधान नसून दारुड्या आहे. तो देश विकायला निघाला आहे. प्रमाणे एखादा दारुडा दारु पिण्यासाठी बायकोला मारतो नंतर दारुसाठी घर विकतो त्याप्रमाणे मोदी आहेत,’ असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  दरम्यान  २५ ऑक्टोबरला ऊस तोड कामगार, मुकादम आणि बैलगाडी वाहकांची परिषद घेणार, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून केली आहे. भगवानगडाच्या पायथ्याला ही परिषद होणार आहे. पाच वर्षापूर्वी झालेला करार आता पूर्ण झाला. त्यामुळे आता त्याचा फेरविचार व्हावा यासाठी परिषद आहे, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ऊस तोडणीबाबत नवा करार होत नाही तोपर्यंत ऊसतोड कामगार संपावर जाणार, असंही सांगण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!