CoronaMaharashtraUpdate : राज्यात आज आढळून आले कोरोनाचे १४ हजार ५७८ नवे रुग्ण , ३५५ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 14578 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16715 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 1196441 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 244527 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.81% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 7, 2020
गेल्या २४ तासात राज्यात १४ हजार ५७८नवे रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत राज्यात ११ लाख ९६ हजार ४४१ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ८०.८१ टक्के झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी मृत्यूची संख्या मात्र कमी झालेली नाही. दिवसभरात ३५५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा २.६४ एवढा झाला आहे. बुधवारीही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त होतं. दिवसभरात १६ हजार ७१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान आता सरकारने कोरोनाची माहिती देणे कमी केले आहे.