Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात आज आढळून आले कोरोनाचे १४ हजार ५७८ नवे रुग्ण , ३५५ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात १४ हजार ५७८नवे  रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत राज्यात ११ लाख ९६ हजार ४४१ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण  हे ८०.८१ टक्के झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी मृत्यूची संख्या मात्र कमी झालेली नाही. दिवसभरात ३५५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा २.६४ एवढा झाला आहे. बुधवारीही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त होतं. दिवसभरात १६ हजार ७१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान आता सरकारने कोरोनाची माहिती देणे कमी केले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!